पान:विधवा दुःख निवेदन.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११] १४ वर्षांचे होते व त्यांचे मराठी लिहिणे होऊन इंग्रजी तीन चार बुकें झाली होती. त्यांचेच बरोबर माझा विवाह संबंध जुळला. आणि मला तेथे देण्याकरितां थोडा हुंडा ठरविला. पण त्यावेळी हुंड्यांचे मान इतकें नव्हते. आतां हुंडा ह्मणजे नवऱ्याची परिक्षा किंवा सासयाचे पगारावर अवलंबून असतो. घरदार, शेतभात, जोडजिनगी, कांही असो अगर नसो, हा विचार हुंडा घेणारा किंवा देणारा दोघेही करीत नाहीत, ही मोठ्या आश्चर्याची व खेदाची गोष्ट आहे. असो, याचा विचार पुढे करितां येईल. असून थोडीसी माझी हकिगत देऊन नंतर याविषयी माझा जो वाद आहे तो पुढे आणिते. थोडक्याच पैशांतून आमच्या वडिलांनी उत्तम घर शोधन काढले; व माझें लग्न ठरले. माझें लग्न थोडक्यांत आटपल्यावर मला घेऊन सासरची मंडळी परत त्या शहरांत आली. माझ्या सासरची मंडळी सूज्ञ असल्यामुळे मला बिलकूल त्रास झाला नाही. घरांत काही असेल नसेल ते सर्व जमाकरून माझ्या अंगावर दीड दोन हजारांचा विषय घातला होता. मी सर्वांत लहान असल्यामुळे मजवर सर्वांची ममता असे; पुढे उत्तरोत्तर माझ्या सासरची पैशासंबंघाने चढतीकळा सुरू झाली. पण माझ्या लग्नास वर्ष दीडवर्ष होते की नाही तोपर्यंत माझी वडील जाऊ बाळंत होऊन वारली. व घरांत मोठा बखेडा उत्पन्न झाला. त्यावेळी माझी मधली जाऊ पंधरा वर्षांची व मी नऊ वर्षांची