पान:विधवा दुःख निवेदन.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१०] त्यामुळे त्यांचे जाणेयेणे थोरामोठ्याचे घरांत फार असे. त्या वेळी डाक्टर लोक फार नव्हते. कदाचित् एखादा डाक्टर असला तरी जुन्या लोकांचा त्यांच्यावर विश्वास नव्हता. कारण डाक्टर ह्मणजे दारू देतात किंवा असुरी उपाय करितात हाच त्यांचे मनाचा ग्रहें. याचे कारण वरोबरच आहे की, चारपांच बुका पर्यंत विद्या शिकून मुलकी परिक्षा पास झाली ह्मणजे दहा मनुष्यांचे पोट भरण्याला काही हरकत नव्हती. आतां विद्यादेवीचे प्राबल्य इतकें वाढले आहे की, वयाला चाळीस वर्षे जरी झाली तरी कालेजांतील परिक्षा संपत नाहीत. पुढे व्हा डाक्टर, वकील किंवा मास्तर आणि भरा कुटुंबाची पोटें ! तोपर्यंत चाळीशी लावून आजोबा ह्मणून घेण्याची वेळ येते. दुसर, बुकांचा सुकाळ इतका झाला आहे की, रोजनिशि, वर्तमानपत्रे, लहान लहान बुके, शिवाय वाग्भटादिक मोठाल्या ग्रंथाची भाषांतरें थोडक्या किंमतींत मिळू लागली; मग काय विचारितां ? आबाल वृद्धांना सर्व औषधे माहीत झाली; शिवाय शहरांत दोनतीन डाक्टर! मग बिचाऱ्या नेटीव वैद्यांना विचारतो कोण ? पूर्वीची स्थिती तशी नव्हती ह्मणून आमच्या श्वशूरांचा धंदा चांगला चाललेला होता; त्यांचे कुटुंब मोठे नव्हतें ह्मणून मागे सांगितलेच आहे. ३ मुलगे १ मुलगी २ सुना आणि ते उभयतां. माझे दोघे वडील दीर लहान लहान कामें धरून पुढे परिक्षेचा अभ्यास करीत होते. व त्यांच्या तिसऱ्या चिरंजिवाचे वय