पान:विधवा दुःख निवेदन.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आमचे वडील फार दिलगिरी असत. कारण आमचे वडिलांनी एखादेवेळी जर कोणतीही गोष्ट काढिली तर ते रागानें चारचार महिने घरीसुद्धा येत नसत. व खाणा. वळींत जेवीत; त्यामुळे निरुपायास्तव गप रहावे लागे. आमची काकू जरी पतीचे आचरणामुळे त्रासलेली होती, तरी पण आमचे भावंडांचे खाणेपिणे, जेवणखाण अगदी व्यवस्थेनें करी. आणि घरांतील सर्व विचार तिच्याच सल्याने चालला होता. आमच्या वडीलांनी जरी द्वितीय संबंध केला होता तरी त्यांचे लक्ष मुलांचे विद्याभ्यासाकडे दक्ष असे. त्यांची दुसरी पत्नी ही सुशील व शहाणी होती. ह्मणून जावेच्या मताने वागत असे. आमचे वडील फार कडक व रागीट होते. त्यामुळे घरांतील सर्व मनुष्ये त्यांना पहातांच लहानापासून थोरापर्यंत थरकाप भीत असत. माझ्या वयाला आठ वर्षे झाली. तेव्हां ते माझ्या लग्नाविषयी विचार करू लागले. खचाचे कामांत त्यांचा हात फार आंखूड होता. ह्मणून त्यानी मला त्यांचे योग्यतेचे घर त्या शहरांत पाहिले. ते घर जरी त्यावेळी श्रीमंत नव्हते, तरी पण होतकरू, सुशील व संभावित होते. त्यांचे कुटुंब फार नव्हते. आमचे श्वशूर आपल्याला शास्त्री ह्मणवीत. तेही आपले मुलाचे विद्ये करितां आपला देश सोडून त्या शहरी येऊन राहिले होते. तेथील हायस्कुलमध्ये त्यांना मास्तराची जागा मिळाली. पुढे काही दिवसांनी शाळेत शिकवून उरलेल्या वेळांत ते वैद्यकीय धंदा करीत,