पान:विधवा दुःख निवेदन.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नाही. माझे वडिल बंधु तिव ह्मणून मागे कळविलेंच आहे. ते जरी फार मोठे नव्हते तरी फार नम्र होते, त्यामुळे घरांतील सर्व मंडळी आमचेवर फारच ममता करीत. त्यांचे मराठी लिहिणे झाल्यावर इंग्रजी शाळेत घालण्याचा विचार झाला, तोपर्यंत घरांत इंग्रजी विद्येचा प्रवेश नव्हता. धाकटे चलते जरी इंग्रजी शिकले होते तरी ते फार स्वच्छंदी आणि चैनी असल्यामुळे घरादाराची काळजी सोडून ते एका शहरांत येऊन राहिले होते. आणि चार पांच बुकां पावेतों इंग्रजी शिकून तेवढ्यावरच ते काम धरून दरमहा शेपन्नास रुपये मिळवीत. पण आलेला सर्व पैसा ते आपल्या ऐषआरामाचे व चैनीचे उपयोगी लावीत. त्यामुळे त्यांचे घर, संसार, बायको, इकडे बिलकूल लक्ष नव्हते. तरी माझे मावांवर त्यांचे प्रेम अतिशय होते. व पुढेही त्यांच्याच विचाराने आमचे बंधूला इंग्रजी शाळेत घातले. त्यामुळे आमचे वडिलांनां त्या शहरांमध्ये घर घणे भाग पडले, आपली मुलें व बंधुची मुले आणि द्वीतीय संबंध केलेली पत्नी लहान असल्यामुळे व आमचे चुलते त्याच शहरी असल्यामुळे त्यांचीच पत्नी आमचे भावंडांचे रक्षणाकरितां आणून ठेविली. हे एक! व दुसरे तिचे पती त्या शहरी असल्यामुळे मुलांच्या संबंधाने ते घरी येतील व आपल्या कुटुंबाकडे त्यांचे लक्ष लागेल. पण त्यांचा हेतू ते जिवंत असेपर्यंत सिद्धिला गेला नाही. असो, त्यामुळे