पान:विधवाविवाह.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८० असा परका पुरुष साध्वी स्त्रीच्या संबंधाने पति कोणत्याही शास्त्रांत झटला नाही; ह्मणजे स्वर्ग प्राप्ति होण्याकरितां आपल्या उदरीं पुत्रोत्पत्ति करावी ह्मणन जर एखादी स्त्री केवळ आपल्या इच्छेने अशास्त्र रीत्या एखाद्या परक्या पुरुषापाशी गमन करील तर तो पुरुष कोणत्याही शास्त्राने तिचा पति असा मानला जाणार नाही. कारण, शास्त्रप्रतिपादित रीतीने ज्या पुरुषाबरोबर ज्या स्त्रीचा विवाह झाला आहे त्यापुरुषास मात्र त्या स्त्रीच्या संबंधाने पति हा शब्द शास्त्रांत लावला आहे. यास्तव आमच्या प्रतिपक्ष्यांनी लिहिलेल्या अर्ध्या वचनाचा वास्तविक अर्थ असा आहे की, स्वर्गप्राप्तीकरितां पत्र व्हावा ह्मणन उत्सुक झालेली विधवा अन्य परुषापाशी गमन करील तर तो अन्य पुरुष तिचा पति ह्मणतां येत नाही. नाहीतर जर स्त्रीने शास्त्रप्रतिपादित रीतीने द. सऱ्या परुषापाशी विवाह करावा तर तसि दुसरा पति च होणे नाही, असा त्या वचनाचा अर्थ असता तर तो, स्वतः मननें पौनर्भव पुत्राविषयी जो विधि सांगितला आहे त्यास विरुद्ध झाला असता-पौनर्भव पुत्रास मनूने मातापितरांस पिंडदान करण्याचा व त्यांच्या मालमत्तेचा वारस होण्याचा अधिकार सांगितला आहे. मनच्या दुसऱ्या एका अर्ध्या वचनाचा, संदर्भानें जो वास्तविक अर्थ होतो त्याचा विचार नकरितां भलताच अर्थ घेऊन विधवाविवाह मनूच्या मती निषिद्ध आहे, असे सिद्ध