पान:विधवाविवाह.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करण्याकरितां आमच्या प्रतिपक्ष्यांनी आणखी एक प्रकार लिहिला आहे. तो असाः न विवाहधिवावुक्तं विधवावेदनं पुनः । ९.६५. " लग्नाच्या विधीमध्ये विधवांच्या पुनर्विवाहाचा उल्लेख कोठे केला नाही" परंतु हे वचन वास्तविक च विधवांच्या विवाहाचे निषेधक मानले असतां ते पौनर्भव पुत्रांविषयी मनूनेच सांगितलेल्या विधीस विरुद्ध होईल, हे त्या प्रतिपक्ष्यांच्या मनांत आले नाही. वर लिहिलेले अर्धेच वचन घेऊन पाहिले असतां, त्यांच्या आशयाप्रमाणे त्याचा अर्थ होईल खरा. परंतु मागचा पढचा संदर्भ, ग्रंथकांचा उद्देश आणि प्रसंग हे सर्व पाहिले असतां, वर लिहिलेला अर्थ व आशय कधी स्थापन करता येणार नाहीत. ते असे की:देवराद्वा सपिण्डाद्वा स्त्रिया सम्यङ् नियुक्तया । प्रनेप्सिताविगन्तव्या संभानस्य परिक्षये ॥ ९.५९. विधवायां नियुक्तस्तु घतातो वाग्यतो निशि । एकमत्पादयेत् पुत्रं न द्वितोयं कथचन ॥ ९.६०. द्वितीयमेके प्रजनं मन्यन्ते स्त्रीषु तद्विदः ॥ अनिर्वत्तं नियोगार्थं पश्यंतो धम्र्मतस्तयोः ॥ ९,६१. विधवायां नियोगार्थे नित्ते तु यथाविधि । गुरुवच्च स्नुषावच्च वर्तेयातां परस्परम् ॥ ९.६२. नियक्ती यो विधिं हि वा वयातान्नु कामतः । तावुभौ पतितो स्यातां स्नुषागगुरुतल्यगौ ॥ ९.६३. नान्यस्मिन् विधवा नारी नियोक्तव्या दिनातिभिः ।