पान:विधवाविवाह.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

" ब्रह्मचाऱ्यांस पुत्र नसतां जशी स्वर्गप्राप्ति होते तद्वतच पति मरण पावल्यानंतर जी साध्वी स्त्री ब्रह्मचर्यव्रताने राहते तिलाही पुत्र नसतां स्वर्गप्राप्ति होते." "अपत्यप्राप्तीकरितां जी स्त्री भर्त्याखेरीज अन्यापाशी गमन करिते तिची इह लोकी निंदा होते; आणि मरणानंतर तिला पतिलोक प्राप्त होत नाही." "कोण्या एखाद्या स्त्रीच्या उदरीं अन्य पुरुषापासून उत्प. न झालेले अपत्य त्या स्त्रीची प्रजा होत नाही. आणि दुसज्याच्या स्त्रीच्या उदरीं ज्या पुरुषापासून अपत्य उत्पन्न झाले, त्या पुरुषाचीही ते प्रजा होत नाही. आणि कोणत्याही शास्त्रांत साध्वी स्त्रियांच्या संबंधाने अन्य पुरुषांस. पति हटलेले नाही." वसिष्ठ ह्मणतो:अनंता: पुत्रिणां लोकाः नापुत्रस्य लोकोऽस्तीति श्रूयते । अ. १७. " पत्रवंतास अनंतकाल स्वर्गप्राप्ति आहे, आणि अपुत्रिकास स्वर्गप्राप्ति मुळीच नाही, असे वेदांत सांगितले आहे." या वचनावरून अपत्य नसलेली जी विधवा स्त्री आपणास स्वर्गप्राप्ति होणार नाही अशी भीति धरते, आणि स्वर्गप्राप्ति होण्याकरितां पुत्र व्हावा ह्मणून अन्य पुरुषापाशीं गमन करिते, ती ह्या लोकी निंदेस पात्र होऊन स्वर्गलोकास अंतरते. कारण, अशास्त्रगतीने परक्यापासून झालेला पुत्र, शास्त्रांत त्या स्त्रीचा कायदेशीर पुत्र मानला नाही. तो उत्पादक परका पुरुष तिचा पतिच कां मानूं नये अशी शंका घेतल्यास मनु ह्मणतो की,