पान:विधवाविवाह.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

यावरून असे दिसते की, कलियुगाच्या आरंभापासून प्राचीन युगांतील पौनर्भव पुत्रांस औरस पुत्रांत गणण्याचा संप्रदाय पडला. आमच्या विरुद्धपक्षाच्या लोकांनी विधवांचा विवाह मनच्या मती निषिद्ध आहे, असे दाखविण्याकरितां मनची वचने उतरून घेतली आहेत, त्यांचा वास्तविक अर्थ व आशय काय आहे, याचा आतां विचार करूं. त्यांनी आपला उद्देश साधण्याकरितां मनुवचनाचे हे पुढील अर्ध लिहिले आहे. न द्वितीयश्च साध्वीनां कचिद्भर्वोपदिश्यते । ५.१६२. “साध्वी स्त्रियांस दुसरा पति आहे असे कोणत्याही शा. स्त्रांत हटले नाही." परंतु या वाक्याचा वास्तविक अर्थ व मागील संदर्भाचें तात्पर्य यांचा विचार केला ह्मणजे आमच्या प्रतिपक्ष्यांचा हेतु तडीस जाणार नाही. मृते भतरि साधी स्त्री ब्रह्मचर्य व्यवस्थिता । स्वर्ग गच्छत्यपुत्रापि यथाते ब्रह्मचारिणः॥ ५.१६० अपत्यलोभाद्या तु स्त्री भर्तारमतिवर्त्तते । सेह निन्दामवाप्नोति पतिलोकाच हीयते ॥ ५.९६१ नान्योत्पन्ना प्रजास्तीह न चाप्यन्यपरिग्रहे । न द्वितीयश्च साधीनां वचिद्भपिदिश्यते ॥ ५.१६२

  • शतेषु षट्स साढेषु व्याधेकेषुच भूतले । कलेगतेषुवर्षाणामभवन् कुरुपाण्डवाः॥

"कलियुगाचा प्रारंभ झाल्यावर ६५३ वर्षांनी कुरु आणि पांडव झाले., कल्हन याची रजतरंगिणी, तरंग १.