पान:विधवाविवाह.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हाच्या स्त्रिया व औरस पुत्र यांपासून निराळी मानली जाणार नाहीत. पुनर्विवाहित विधवांचे पुत्र कलियुगांत औरस पुत्रच होत, या सिद्धांतास महाभारतही प्रमाण आहे. ते असे की, नागराज ऐरावत याने आपली विधवा कन्या अर्जुनास दिली, आणि तिजपासन इरावान नांवाचा पुत्र झाला, तो अर्जुनाचा औरस पुत्र मानलेला आहे. अर्जुनस्यात्मजः श्रीमानिरावान्नाम वीर्यवान् । सतायां नागराजस्य जातः पार्थेन धीमता ॥ रावतेन सा दत्ता ह्यनपत्या महात्मना । पत्यो हते सुपर्णेन कृपणा दीनचेतना ॥* महात्मा असा जो नागराज ऐरावत त्याने आपल्या कन्येचा पति मुपर्णाने मारल्यानंतर दुःखित झालेली आणि पोटी संतान नसलेली ती दीन कन्या विवाह करून अर्जुनास दिली. नंतर अर्जुनापासून त्या कन्येस इरावान नांवाचा एक सुंदर व पराक्रमी असा पुत्र झाला. - अजाननर्जुनश्चापि निहतं पुत्रमौरसम् । जघान समरे शूरान् राज्ञस्तान् भीष्मराक्षिणः ॥ " अर्जनही आपला औरस पुत्र मारला असे न जाणत भीष्माचे संरक्षण करणारे जे शूर राजे त्यांस रणांगणांत मारिता झाला." * भीष्मपर्व, अध्याय ९१