पान:विधवाविवाह.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

झाला आहे त्यांजप्रमाणेच मानल्या आहेत. आणि त्यांजपासून झालेले पुत्र पौनर्भव असे न मानतां सर्व गोष्टींविषयीं औरसच मानले आहेत. मातापितरांस पिंडदान क. रणे, त्यांच्या मालमत्तेचे वारस होणे वगैरे, पुत्रांनी करावयाच्या गोष्टी ते औरस पुत्रांप्रमाणेच करितात. त्यांस च. कूनही कधी पोनर्भव असें ह्मणत नाहीत. आतां असा विचार केला पाहिजे की, पर्वीच्या युगांतील सात प्रकारच्या पुनर्भूपैकी चार प्रकारच्या पुनर्भूचा विवाह सांप्रत चालू आहे, आणि प्रथमविवाहसंबंधाच्या स्त्रियांप्रमाणेच त्या मान्य व पवित्र मानल्या असून त्यांस निराळ्या प्रकारचे विशेषणही नाही; आणि त्यांच्या अप. त्यांस औरस पुत्रांपासून निराळे मानले नाही. आतां जा राहिलेल्या तीन प्रकारच्या पुनर्भूचा विवाह प्रचारांत आर तर वरील युक्तीने त्यांसही प्रथमविवाहसंबंधाच्या स्त्रियांप्रमाणेच मानण्याविषयों व त्यांच्या पुत्रांस औरसर विषयी कोणताही प्रतिबंध होणार नाही. यावरूनच पराशर प्राचीन युगांतील पुनर्भस प्रथम विवाहसंबंधाच्या स्त्रियांचे, आणि प्राचीन काळच्या पोनर्भव पुत्रांस औरस पुत्रांचे हक्क व अधिकार देतो; आणि प्राचीन युगांतील चार प्रकारच्या पुनर्भू व पौनर्भव यांत प्रथम विवाहित स्त्रिया व औरस पुत्र असेच मानण्याचा प्रकार हल्ली चालही आहे; त्यापक्षी पुनर्विवाह केलेल्या विधवा व त्यांची अपत्ये ही प्राचीन युगांत पुनर्भू व पौनर्भव या संज्ञांनी प्रसिद्ध होती, तरी आतां कलियुगांत प्रथम विवा