पान:विधवाविवाह.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असत्या तर त्याने अशा स्त्रियांस पुनभू हा शब्द लावला असता आणि सांगितलेल्या पुत्रांच्या प्रकारांत पौनर्भव पुत्रांचे परिंग. णन केले असते. कलियुगामध्ये अशा स्त्रियांस पुनk शब्द लावायाचा नाही, आणि त्यांजपासून झालेल्या पुत्रांस पौनर्भक या प्रकारचे न मानितां औरसच मानावयाचे, हे चाल संप्रदायावरूनही सिद्ध आहे. पाहा की, वाणीने एखाद्या पुरुषास कन्या दिल्यानंतर विवाह होण्यापूर्वीच तो पुरुष मेला अथवा दुसऱ्या कारणाने त्याजबरोवर व्हावयाचा विवाह रहित झाला तर त्या कन्येचा विवाह दुसऱ्या पुरु. पाबरोबर होतो. मागील युगांत अशा स्त्रियांस पुनर्भू व त्यांच्या संततीस पौनर्भव असें ह्मणत असत. ते असेः सप्त पौनर्भवाः कन्या वर्जनीयाः कुलाधमा। वाचा दत्ता मनादत्ता कृतकोतकमंगला । उदकस्पर्शिता या च या च पाणिग्रहीतिका । आनं परिगता या च पुतर्भप्रभवा च या ।। इत्येताः काश्यपेनोक्ता दहन्ति कलमग्निवत् ॥+ हल्लीच्या काळांत वर सांगितलेल्या सात प्रकारच्या पु. नर्भपैकी वाग्दत्ता, मनोदत्ता, कृतको तुक मंगला आणि पुन प्रभवा या चार प्रकारच्या पुनर्मूचा विवाह धडका चालूच आहे. अशा स्त्रियांस जरी पूर्वीच्या युगांत पुनk ह्मणत असत, तरी आतां त्यांस निराळे विशेषण लागत नाही, आणि सर्व गोष्टींमध्ये त्या, ज्यांचा प्रथमच विवाह संबंध + अर्थ 33व्या पृष्ठावर पाहा.