पान:विधवाविवाह.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पिंडदोंऽशहरश्चैषां पूयाभावे परः परः। २.१३२. " या बारा प्रकारच्या पुत्रांमध्ये पूर्वी पूर्वी सांगितलेले पुत्र नसल्यास पुढचे पुढचे पुत्र पित्याच्या मालमत्तेचे यथाक्रम कायदेशीर वारस व त्यास पिंड देणारे असे होतात." याप्रमाणे मनु व याज्ञवल्क्य यांनी पोनर्भव पुत्रास कायदेशीर वारसाचा हक्क व श्राद्ध करण्याचा अधिकार हे सांगितले असतां त्यास बेकायदेशीर अथवा अशास्त्र ह्मणणे हे अगदीच अप्रयोजक आहे. मनु, याज्ञवल्क्य, विष्णु व वसिष्ठ यांनी काही आपत्ती. च्या प्रसंगी स्त्रियांचा पुनर्विवाह मान्य केला आहे ; यास्तव मनु व दुसरे स्मतिकर्ते यांच्या मतास विधवाविवाह विरुद्ध आहे हे ह्मणणे अगदी निराधार आहे. आणि हे झणणे ज्यांनी मन व दुसरे स्मृतिकर्ते यांच्या स्मृतींचा पूर्ण अभ्यास केला नाही त्यांचेच असावेसे दिसते. कारण, त्यास्मतींचे ज्ञान पूर्ण असल्यावर अशा निराधार व खोट्या मताचें प्रतिपादन कोणी करील असे वाटत नाही. विधवाविवाह मन्वादि स्मृतिकत्यांच्या मनास वास्तविकच विरुद्ध नाही. इतकीच एक गोष्ट समजली पाहिजे की, दुसन्यावेळेस विवाह झालेल्या स्त्रियांस ते पनर्भ ह्मणत असत आणि त्यांजपासून झालेल्या पुत्रांस पौनर्भव ह्मणत असत. आणि पराशराच्या मताप्रमाणे अशा स्त्रियांस व अशा पुत्रांस कलियुगांत तो नांवे नाहीत, हा एवढाच काय तो फरक पराशर व अन्य स्मृतिकर्ते यांच्या मतांत आहे, पराशराच्या मनांत कलियुगांत त्या संज्ञा चालवायाच्या