पान:विधवाविवाह.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मनु व दुसरे स्मृतिकर्वे यांनी पोनर्भव (स्त्रीच्या दुसऱ्या विवाहापासून तीस झालेला पुत्र ) याचा उल्लेख केला, यावरून तो पुत्र सशास्त्र आहे, असे सांगण्याचा त्यांचा अभिप्राय नाही ; तर अशा प्रकारचा पुत्र झाल्यास त्यास पौनर्भव ह्मणावें, एवढे सांगण्याचाच त्यांचा अभिप्राय, असे विरुद्धपक्षाच्या काही लोकांचे हणणे आहे. परंत हे केवळ ऐच्छिक आहे. यास आधार काहीच नाही. कारण, निरनिराळ्या प्रकारच्या पुत्रांविषयों ज्या स्मृतिकऱ्यांनी वचने आहेत त्या सर्वांनी पौनर्भव हा सशास्त्र वारस मा. निलेला आहे. औरसादि द्वादश पुत्रांची लक्षणे सांगून मनु शेवटी असें ह्मणतो. बननादीन सुतानतानेकादश यथोदितान् । पत्रप्रतिनिधोनाहुः क्रियालोपान्मनीषिणः ॥९.१८०.. औरस पुत्र नसल्यास पित्याच्या श्राद्धपक्षाचा लोप कोई नये ह्मणन क्षेत्रज इत्यादि अकरा प्रकारचे पुत्र सां. गितले ते यथाक्रम औरस पुत्राचे प्रतिनिधि होतात, असे ऋषींनी मानिले आहे." आणि, श्रेयसः श्रेयसोभावे पापीयानपथमहति। ९.१८१. " कोणताही वरिष्ठ प्रतीचा पुत्र नसल्यास त्याच्या खालच्या प्रतीचा जो पुत्र असेल तो पित्याच्या मालमत्तेचा वारस होतो." याज्ञवल्क्य ही औरसादि पुत्रांची लक्षणे सांगून पुढे असें ह्मणतो की,