पान:विधवाविवाह.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७२० . मनु ह्मणतोया पत्या वा परित्यक्ता विधवा वा स्वयच्छया। उत्पादयत् पुनर्भत्वा स पौनर्भव उच्यते ॥ ९.१७५. " विधवा झालेली अथवा नवयाने स्वेच्छेने टाकलेली स्त्री जर ( यथाविधि ) पुनर्विवाह करील तर, त्या विवाहापासून झालेल्या पुत्रास पौनर्भव ह्मणतात." विष्णु म्हणतोअक्षताभूयः संस्कृता पुनर्भूः । अ. १५. " विवाह झाल्यानंतर ही पुरुषाचा संग न होतां जीस पुनः विवाह संस्कार होतो ती पुन' होय." याज्ञवल्क्य ह्मणतोअक्षता च क्षता चैव पुनर्भूः संस्कृता पुनः १.६७ " पुरुषाचा संग न झालेल्या अथवा झालेल्या ज्या स्त्रीस पुनः विवाह संस्कार होतो तीस पुनर्भू ह्मणतात." वसिष्ठ ह्मणतोया च क्लीबं पतितमुन्मतं वा पतिमुत्सृज्य अन्य पतिं विन्दते मते वा सा पुनर्भवति । अ.१७ " नपुंसक, पतित, अथवा उन्मत ( वेडा ) अशा पतीपत सोडन अथवा पति मेल्यानंतर जी दुसरा पति करिते ती स्त्री पुनर्भू होय." यावरून असे दिसते की, मनु, विष्णु, याज्ञवल्क्य व वसिष्ठ यांनी नवऱ्याचे पातित्य, नपुंसकपणा, उन्मत्तपणा अथवा मृत्यु या अडचणींमुळे स्त्रीचा पुनर्विवाह मान्य केला आहे.