पान:विधवाविवाह.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असे मानिलेले आहेत; सर्वांनी आपआपल्या ग्रंथांत वेदा चाच संग्रह केला आहे ; आणि त्या सर्वांची ही प्रशंसा वेदांत केली आहे; त्या अर्थी त्या सर्वांस आपण एक सार. खाच सन्मान दिला पाहिजे. यामध्ये विशेष एवढाच आहे की, एक एका स्मृतीचे प्रावल्य एक एका युगांत विशेष असते. ह्मणूनच सत्ययुगांत मनु स्मृति, त्रेतायुगांत गो. तमस्मृति, द्वापारयुगांत शंख व लिखित यांच्या स्मृति प्र. वल होत्या; आणि प्रस्तुतच्या कलियुगांत पराशरस्मृति च प्र. वल आहेत. यावरून मनु व पराशर या दोघांच्या स्मृति दोन निराळ्या युगांविषयों असल्यामुळे त्या परस्परांत विरोध उप्तन होईल असा त्यांचा संबंधच नाही. मागे लिहिलेल्या गोष्टींपासून जे सिद्धांत झाले ते अ. से:- मन व पराशर यांच्या स्मृति निराळ्या दोन युगांवि पपी असल्यामुळे त्या परस्परांत विरोध नाही; बृहसतीने सांगितलेले मनु स्मृतींचे प्राबल्य व त्यांस विरुद्ध अशा स्मतीचें दौर्बल्य केवळ सत्ययुगाविषयींच होय; मनु स्मृती. स विरुद्ध स्मृति हल्लंच्या युगांत प्रमाण भूत मानल्या आहे. त. यास्तव पराशराने सांगितलेला जो विधवा पुनर्विवाह तो मनस्मतीस जरी कदाचित् विरुद्ध असला तरी देखील तो करण्यास अगदीच हरकत येत नाही. आतां विधवा व दुसऱ्या स्त्रिया यांच्या विवाहाचे विधायक में पराशराचे वचन तें मन व दुसरे ऋषि यांच्या स्मृतीस विरुद्ध आहे किंवा नाही, याविषयी विचार करूं.