पान:विधवाविवाह.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कोठें वर्णिलेला नाही; तस्मात् त्याच्या स्मृतींस प्रामाण्य स्थापन करणे कठिण आहे." अशी शंका घेऊन पुढे त्याने तिचे निवारण केले आहे. ते असें:नच पराशरमहिम्नोऽश्रौतत्वां सहोवाच व्यासः पाराशयं इति श्रुतौ पराशरपुत्रत्वमुपजव्यि व्यासस्य स्तुतत्वात् । यदा सर्व प्रतिपन्न माहेम्नो वेदव्यासस्य स्तुतये पराशर पुत्रत्वमुपजीव्यते तदा किमु वक्तव्यमचिंत्यमाहेमा पराशर इति । तस्मात् पराशरोअपि मनुसमान एव । एष एव न्यायो वशिष्ठात्रियाज्ञ वल्क्यादिषु योजनीयः। "पराशराचा श्रेष्ठपणा वेदांत कोठें वर्णिलेला नाही असे नाही. 'पराशराचा पुत्र व्यास याने मटले आहे' या (अर्थाच्या श्रुतीच्या) वाक्यांत व्यासाचा श्रेष्ठपणा पराशराचा पत्र या संबंधाने मानिला आहे. मुळी व्यासाचाच श्रेष्ठपणा सर्व संमत आहे, आणि त्यासही पराशराचा पुत्र या नात्याने ज्यापक्षी वेदांत मोठा मान दिला आहे, त्यापक्षी स्वतः पराशराच्या श्रेष्ठपणाविषयी काही संशयच उरला नाही. तेव्हां पराशर ही मनूप्रमाणेच श्रेष्ठ होय. वसिष्ठ, अत्रि, याज्ञवल्क्य, इत्यादि ऋषीविषयों याच न्यायाची योजना करावी ; ह्मणजे त्यांचाही मोठेपणा वेदांत वर्णिलेला आहे यास्तव तेही मनप्रमाणेच श्रेष्ठ होत." यावरून निखालस असा निर्णय झाला की, ज्याअर्थी संहितांचे सर्व कर्ते एक सारखेच महा ज्ञानी व विचारशील