पान:विधवाविवाह.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हाच्या पूर्वीच मेल्यास मनु तिच्या विवाहाचा निषेध करितो, माणि तिने त्याच्या भावापासून एक पुत्र उत्पन्न करून घेऊन पुढे आमरणांत विधवा राहावे असे सांगतो; आणि त्याच आपत्तींत वसिष्ठ तिचा विवाह करण्यास सांगतो. देशांतील हल्ली चालू संप्रदाय वसिष्ठस्मृतीप्रममाणेच आढळतो. ह्मणजे ज्यास कन्या देण्याचे ठरले असतें तो विवाहाच्या पूर्वी मेल्यास ती कन्या वसिष्ठस्मृतीप्रमाणे दुसऱ्या वरास लग्न करून देतात, मनुस्मृतीप्रमाणे तिला जन्मवर विधवा ठेवीत नाहीत. याप्रमाणे पुष्कळ गोष्टींविषयी लोकांतील संप्रदाय पाहिले असतां कलियुगांत मनुस्मृतीस विरुद्ध अशा दुसज्यांच्या स्मृतीस अनुसरून असलेले ते पुष्कळ आढळतात. आणि मनने सांगितलेले धर्म केवळ सत्ययुगासच लाग आहेत असे पराशर सांगतो ; तेव्हां बहस्पतीने मांगितलेले जे मनूच्या स्मृतीचे प्रामाण्य व त्याच्या विरुद्ध दुसऱ्या स्मृतींचे अप्रामाण्य ही फक्त सत्ययुगाविषयींच समजली पाहिजेत. नाहीतर मनूने वेदार्थाचा संग्रह आपल्या स्मतीत केला आहे , यास्तव तोच स्मृतिकर्ता मुख्य, असें बृहस्पतीचे वचन आहे ते असंगत होईल.- वेदाांचा संग्रह एकटया मनूनेच आपल्या स्मृतीत केला आहे आणि याज्ञवल्क्य, पराशर व दुसरे ऋषि यांनी तो केला नाही काय ? त्यांनी आपल्या स्मृतीमध्ये स्वकपोलकल्पि. त व वेदार्थास विरुद्ध असे धर्म लिहून ठेविले आहेत काय? त्यांस वेद समजत नव्हते किंवा त्यांनी आपल्या सहितांत