पान:विधवाविवाह.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वर विला आमरणांत विधवा धर्माने राहाण्या विषयों आज्ञा करितो. यास्तव या मताप्रमाणे वाचादत्त कन्येचा वर, विवाहाच्या पूर्वी मेल्यास तो विवाहास पात्र नाही; आणि वराच्या संततीचा विच्छेद होऊ नये ह्मणून दिरापासून तिलापन झाला ह्मणजे तिने यावज्जीव विधवाच राहावे असे आहे. परंतु वासष्ठ हणतोःअद्भिर्वाचा च दत्तायां नियेताथो वरो याद । मंत्रोपनीता स्यात् कुमारी पितुरेव सा॥ यावच्चेदाहताकन्या मंत्रैयदि न संस्कृता। यस्मै विधिवया यथा कन्पा तथैव सा॥अ० १७. अभिषेक करून अथवा वाणीने कन्यादान केल्या नंतर तिचा पति मेला तर तिचे विवाहमंत्रांनी दान झाले न. सल्यास ती कन्या पूर्वी प्रमाणे पित्याचीच होय." " विवाह संबंधी मंत्रांचा संस्कार न करितां केवळ वाणी. नेच कन्या दिली असल्यास तिचे दान यथाविधि दुसऱ्या वरास करावे. केवळ वाणीने दिल्यामुळे तिचे कन्यात्व भन होत नाही." या प्रमाणे, वाणीने दिलेल्या कन्येचा मागणारा वर पिवाह होण्या पूर्वी मेला असता त्याच्या मरणापासून तिचे कन्यात्व नाहीसे होत नाही, असे मानून तिचे दान यथाशास्त्र दुसऱ्या वरास करावे असे वसिष्ठ सांगतो. आतां यावरून मनु व वसिष्ठ यांच्या स्मृतीत मोठा विरोध आहे किंवा नाही तो पाहा. कन्या मागणारा वर विवा