पान:विधवाविवाह.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तिसरे उदाहरण: मनु म्हणतोयस्या ब्रियेत कन्याया वाचा सत्ये कृते पतिः । तामनेन विधानेन निजो विदेते देवरः। ९.६९. यथाविध्यधिगम्यैनां शुक्लवस्त्रां शुचिव्रताम् । मिथो भनेदाप्रसवात् सकृत् सकृढतावृती॥ ९.७०. न दत्वा कस्यचित् कन्यां पुनर्दद्याद्विचक्षणः । दत्वा पुनः प्रयच्छन् हि प्राप्नोति पुरुषानृतं ॥९.७१. "कन्या वाचादत्त झाल्या नंतर तिचा विवाह होण्या पूर्वीच तिचा वर मेला तर त्याच्या भावाने त्या कन्येस पुत्रोत्पत्ति होण्या करितां तिचा ह्या विधीने स्वीकार करावा." "तिने पांढरे वस्त्र नेसावे आणि पवित्र व सदाचार असावे अशा तिचा स्वीकार पुत्रोत्पत्तीकरितां करून दरएक ऋतंत योग्यकाळी एकएकवेळ, या प्रमाणे पुत्र होई पर्यंत त्याने तिशी गमन करावे." " सुज्ञ मनुष्याने आपली कन्या एका मागणारास वाणीने एकवेळ दिल्यावर ( विवाह होण्या पूर्वी तो मागणारा मेला तर) ती पुनः दुसऱ्यास देऊ नये. कारण, जो पूर्वी एकास दिलेली कन्या दुस-पास देतो त्यास कन्या चोरल्याचा दोष लागतो." ज्या वरास कन्या वाचादत्त झाली तो मेल्यास त्या कन्येचा विवाह करण्यास मनु वर सांगितल्या प्रमाणे निषेध करितो; त्या वराच्या भावाने तिचा यथाविधि स्वीकार करून तिला पुत्रोत्पत्ति करून द्यावी, असे सांगतो आणि पुत्रोत्पत्ति झाल्या