पान:विधवाविवाह.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

की नाहीत ती पाहा. मनु क्षेत्रज पुत्रास मात्र बापाच्या मालमत्ते पैकी पंचमांश अथवा षष्ठांश देऊन बाकीच्या सर्व प्रकारच्या पुत्रांस अन्नवस्त्र मात्र देण्यास सांगतो; आणि कात्यान क्षेत्रज व दुसरे जे पुत्र पित्याच्या जातीचे असतील त्या सर्वांसच पित्याच्या मालमत्तेपैकी तृतीयांश द्यावा असे सांगतो. मनच्या मताप्रमाणे पाहतां औरस पुत्र असल्यास दत्तक पुत्र अन्नवस्त्राचा मात्र अधिकारी होतो*. परंतु कात्यायन मताप्रमाणे तो तिसऱ्या हिशाचा वाम होतो. या गोष्टीविषयी लोकांत चाल संप्रदाय पाहिला असतां मनूची आज्ञा न मानितां तिच्याविरुद कात्यायनाची आज्ञा तीच मानितात, ह्मणजे हड़ीच्या काळांत औरस पुत्र कायम असतां दत्तक पत्र केवळ नाचा अधिकारी न होतां पित्याच्या मालमत्तेच्या ति. या हिशाचा अधिकारी होतो. कलियुगामध्ये देखील मनस्मतीस विरुद्ध ज्या स्मृति त्या सर्व त्याज्य होत, असा जर बदम्पतीचा अभिप्राय असता तर वरील गोष्टीत कात्यायन स्मति कशी प्रबल मानली असती. या अंगी उत्तम प्रकारचे गुण असले तर तो औरसाबरोबर मालमत्तचा वारस होतो. ते असे:-मनु, उपपन्नो गुणे सर्वैः पुत्रो यस्य तु दस्त्रिमः ।। स हरेव तद्रिक्यं संप्राप्तोऽप्यन्यगोत्रतः ॥ " सर्व सद्रणांनी युक्त असा पुत्र ज्याने दत्तक घेतला आहे त्याच्या मालमत्तेचा वारस तो पुत्र दुस-या गोत्रांतला असला तरी होईलच होईल.'