पान:विधवाविवाह.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वडिलोपार्जित मालमत्तेचा भाग यांचे यथाक्रम वारस होतात." यावरून मनप्रमाणे पाहतां एका मनुष्यास औरस, क्षेत्रज, दत्तक इ. अनेक प्रकारचे पुत्र असले तर क्षेत्रज पुत्रास पित्याच्या मालमत्ते पैकी पंचमांश अथवा षष्ठांश देऊन बा. कीच्या सर्व मालमतेचा वारस औरस पुत्र होईल. आणि दतक इ. जे पुत्र त्यांस त्याने कृपाकरून अन्नाच्छादन मात्र द्यावे. औरस पुत्र नसल्यास क्षेत्रज पुत्र सर्व माल मत्तेचा वारस होईल ; क्षेत्रज पुत्र नसल्यास 'दत्तक पुत्र वारस होईल; आणि असाच क्रम पुढल्या पुत्रांविषयों होय; ह्मणजे मागला नसेल तर पुढचा वारस होतो. परंतु कात्यायन म्हणतो.उत्पन्ने बोरसे पुत्रे तृतीयांशहराः सताः। सवर्णा असवास्तु ग्रासाच्छादनमागिनः॥ "औरस पुत्र उत्पन्न झाला म्हणजे दुसरे पुत्र पित्याच्या जातीचे असल्यास त्यांस पित्याच्या मालमत्ते पैकी ततीयांश मिळतो; परंतु निराळ्या जातीचे असल्यास ते अन्नवस्त्राचे मात्र अधिकारी होतात.” यावरून कात्यायन मताप्रमाणे क्षेत्रज, दत्तक वगैरे जेपत्र ते बापाच्याच जातीचे असल्यास त्याच्या मालमत्तेच्या तिसऱ्या हिशास अधिकारी होतात; पण निराळ्या जातीचे असल्यास केवळ अन्नवस्त्रास अधिकारी होतात. आतां मनु आणि कात्यायन यांची मते परस्पराशी विरुद्ध आहेत

  • दायभागात उतरून घेतलें भाहे.