पान:विधवाविवाह.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तीस वर्षांच्या वरास या प्रमाणेच द्याव्या लागतील; नाही तर नियमभंग होईल. परंतु प्रस्तुत काळी हा नियम चालू असल्याचे कोठे ही दिसत नाही. आणि आठव्या नवव्या अथवा दहाव्या वर्षी मुलीच्या लग्नाचा योग्य का. ळ होय, हा जो अंगिरा ऋषीचा नियम तोच ( यादेशांत ) बहतेक सर्वत्र चालू असल्याचे दिसते. यावरून विवाहकालाच्या निर्णयाविषयों मनचा नियम न मानितां त्याच्या विरुद्ध जो अगिरा ऋषीचा नियम त्याचा अंगीकार लोक कारतात. दुसरें मनु असें म्हणतोएकएवौरसःपुत्रः पित्र्यस्य वसुनः प्रभुः । शेषाणामानृशंस्याथै प्रदद्यात्तु प्रजविनम् ॥ ९.१६३. बान्त क्षेत्रनस्यांशं प्रदद्यात् पैतृकाद्धनात् । औरसो विभजन दायं पित्र्यं पंचममेव वा ॥ ९.१६४. औरसक्षेत्रनी पुत्री पितृरिक्थस्य भागिनी। दशापरे त क्रमशो गोत्रारक्यांश भागिनः॥९.१६५. बापाच्या मालमत्तेचा वारस एक औरस पुत्र मात्र होतो; त्याने बाकीच्यांस उपजीविकेसाठी अन्नाच्छादन मात्र द्यावें." "औरस पुत्राने बापाच्या मालमत्तेची वाटणी केल्यास आपल्या बापाच्या क्षेत्रज पुत्रास तिचा एक पंचमांश अथवा षष्ठांश द्यावा." "औरस व क्षेत्रज हे दोन पुत्र पित्याच्या मालमत्तेस वारस होतात. दुसरे दहा पुत्र गोत्र ( कुळ कुळाचार ) व