पान:विधवाविवाह.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वाह करून टाकावा. अशा प्रकारचा विवाह निषिद्धकाली जरी केला तरी तत्प्रयुक्त दोष अगदी लागत नाही.' या प्रमाणे अंगिरा ऋषीने आठवें, नववे, आणि दहावे ह्या वर्षांत मुलीचे लग्न करावे, ह्मणजे मुलीच्या लग्नाचा योग्य काळ या वर्षांत आहे असे सांगितले आहे. आणि दहा वर्षों पुढे राहिल्यास तिला जन्मभर लग्नावांचून राहावे लागेल, या भीतीस्तव तो असे सांगतो की, दहावर्षांच्या कन्येचे लग्न, ज्या दिवसांमध्ये लग्नाचा निषेध आहे त्या दिवसांत केले तरी त्या विषयी प्रत्यवाय नाही. परंतु विवाहा विषयों पुरुषास चोविसावे, तिसावे अथवा दुसरे कोणते ही एखादें वर्ष सांगून काही कालमर्यादा त्याने केली नाही. आतां असा विचार केला पाहिजे की, वर लिहिलेली पर आणि अगिरा यांची मते, परस्परांशी विरुद्ध आहेत किंवा नाहीत. मुलीच्या लग्नाचा काळ झटला ह्मणजे आठवें अथवा वारावे वर्ष असे मनु ह्मणतो, आणि या खेरीज ज्या काळांत लग्न करणे दोषावह आहे असे सांगतो. आणि अंगिरा लणतो की, मुलीचे लग्न आठ, नऊ अथवा दहा या वर्षांत केले पाहिजे; त्यांत दहावे वर्ष झणजे परमावधि झाला; यापढे मुलीस लग्नावांचून ठेवितां कामास नये. यावरून त्याच्या मताप्रमाणे बारावे वर्ष मणजे लग्नाचा योग्य काल मळींच नव्हे. प्रस्तुत काळचा संप्रदाय अंगिराच्या मतास अनुसरून आहे, मनूच्या मतास अनुसरून नाही. या गोष्टीत मनूच्या माज्ञचे अनुसरण केले असतां आठ वर्षांची मुलगी चोवीस वर्षांच्या वरास, व बारा वर्षांची