पान:विधवाविवाह.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आणि आदिपुराण हा पुराण ग्रंथ होय; आणि स्मृति व पुराण यांचा परस्परांशी विरोध आल्यास पुराणापेक्षा स्मृति बलवत्तर समजावी, ह्मणजे तशा ठिकाणी पुराणाची आज्ञा न मानितां स्मतीच्या आज्ञे प्रमाणे चालावे असें मागे ( १९ व्या पृष्ठावर) स्पष्ट सिद्ध केले आहे. या नियमावरून स्मातिवचन व मुराणवचन यांचा विरोध आल्यास पुराणवचनांमुळे स्मृतिवच. नांच्या अयांत फरक कधी होणार नाही. तिसरे, विशेष विधीच्या प्राबल्याविषयों मागल्या आध्यायांत जी रीत लि. हिली आहे तिजवरून आदिपुराणांतल्या वचनाने पराशर स्मृतीच्या अर्थाचा संकोच न करितां उलटा पराशरस्मतीमुळे आदिपुराणांतल्या वचनाच्या अर्थांचा संकोच केला पाहिजे. आदिपुराणांतील निषेध सामान्य आहे आणि पराशरसंहितेतील विधि विशेष आहे; आणि सामान्य नियम विशेष नियमाचा बाधक न होतां उलटा विशेष नि सामान्य नियमाचा बाधक होईल. आतां यावरून पाहा, स्त्रियांच्या पुनर्विवाहाविषयाँ, पराशरवचन कलियुगाखेरीज इतर युगांस लाग आहे हैं माधवाचार्याचे मणणे (१) संहितेच्या उद्देशास व तात्प सि विरुद्ध आहे; (२) त्याच्या स्वतांच्या व्याख्यानास विरुद्ध आहे; ( ३ ) ज्यावचनामुळे हे ह्मणणे निघाले ते आदिपुराणांत नाहीं; ( ४ ) ते आहे असे घेतले तरी स्मति व पुराण यांचा विरोध आला असतां स्मृति बलवत्तर ह्या व्यासाच्या नियमास विरुद्ध आहे; (५) आणि विशेष नियमाने सामान्य नियमाचा बाध होतो या सर्वशास्त्रप्रासद्ध