पान:विधवाविवाह.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नियमासही विरुद्ध आहे. सारांश पराशराचे विवाहविषयक वचन कलियुगा खेरीज इतर युगांस लागू हे ह्मणणे अगदी पळपळीत आहे. कोणी असे ह्मणतील की, माधवाचार्य महान् विद्वान पुरुष होता; युक्ति प्रयुक्तीचा विचार अगदी न करितां त्याचे में मत असेल ते आम्ही मान्य करावे; तर याजवर आमचे एवढेच ह्मणणे आहे की, माधवाचार्य खरोखर विद्वान मनुष्य होता व सर्व गोष्टींनी तो मान्य होता; परंतु तो कधी चुकणार नाही असा नव्हता व त्याची मते सर्वदा प्रमाणभवच असतात असे पूर्वीच्या ग्रंथांत मानलेले ना. ही. त्याच्या ह्मणण्यांत जेव्हां चुका आढळतात तेव्हां त्याच्या मागून झालेले ग्रंथकार त्या काढून त्यांचे सपाटून खंडन करितात. ते असेः यत्त माधवः । यस्तु वाजसनेयीस्यात् तस्य सन्धिदि नात्परा । न वाप्यन्वाहितिः किन्तु सदा सन्धिदिने हि सा इत्याह तत कर्कभाष्य देवजानी श्रीअनन्तभाष्यादि सकल तच्छाखीय ग्रन्थविरोधाइव्हनादराच्चोपेक्ष्य* । "माधवाचार्याचे हे ह्मणणे प्रमाणभूत मानतां येत नाही. कारण, ते कर्कभाष्य, देवजानी, श्री अनंतभाष्य इत्यादि जे वाजसनेयी शाखेचे ग्रंथ त्यांस विरुद्ध आहे आणि बहुत ग्रं. थकारांनी ते अमान्य केले आहे."

  • निर्णयसिंधु, प्रथमपरिच्छेद.