पान:विधवाविवाह.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सिद्ध झाले. आतां, पुनर्विवाह कलियुगाकरितां योजलेला नाही ही कल्पना ज्या आधाराच्या जोरावर तो करितो त्याची वजनदारी कितपत आहे ती पाहूं. स्त्रियांचा पुनर्विवाह कलियुगाखेरीज इतर युगांस लागू आहे, असें ह्मणण्यास पराशरसंहितेचा अथवा "नष्टे मृते" इत्यादिवचनांचा जो अगदी उघड अर्थ आहे त्याचा आधार माधवाचार्यास अगदी सांपडला नाही; तर केवळ आदिपराणांतील एका वचनावरून त्याने असे हटले.. त्याचा भाव असा दिसतो; जरी पराशरसंहिता ही केवळ कलियु. जल धर्म सांगण्याविषयींच झाली आहे व जरी स्त्रियांच्या वाहाचा विधि केला आहे, तरी आदिपुराणांत विवाहित पनर्विवाहाचा कलियुगांत निषेध केला आहे, यास्तव साराचा विधि कलियुग सोडून पूर्वीच्या युगांविषयी आहे असें ह्मणावें. या विचारास तीन बाधके जबर्दस्त आहेत. पहिले, जें वचन आदिपुराणांतून घेतले आहे असे माधवाचार्य ह्मणतो ते आदिपराणांतमु ळीच आढळत नाही, आणि त्या ग्रंथाच्या मळपीठिकेचा विचार केला असतां अशा प्रकारचे व. चन त्यांत सांपडण्याचा संभवच नाही हे स्पष्ट दिसते तेव्हां माधवाचार्याने ज्या वचनाचा उतारा केला त्यास आधारच नाही, व तशा वचनावरून केलेला सिद्धांत निराधारच होय. दुसरें, ते वचन आदिपुराणांत आहे असे मानिले तरी त्याच्या जोरावर पराशराच्या वचनाचा अर्थ फिरवा. वा हे योग्य नव्हे; कारण, पराशरसंहिता ह्मणजे स्मति होय