पान:विधवाविवाह.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रण्याविषयी त्यांस सामर्थ्य नाही; आणि पराशराने कलिधर्म सांगण्यास आरंभ करून सामान्यतः सर्व विधवांविषयों सर्वांत सोपा जो पुनर्विवाहरूपधर्म तोच प्रथम सांगितला आहे, या गोष्टीचा विचार केला असतां असाच सिद्धांत होतो, को पुनर्विवाहाचा विधि कलियुगांतल्या विधवांविषयों योजिलेला नव्हे ही माधवाचार्याची कल्पना युक्तींशी व संहितांकाच्या मूळ उद्देशाशी अगदीच जमत नाही, यास्तव ती खोटी होय. मागें लिहिलेली माधवाचार्याची व्याख्या पराशराच्या मूल अभिनायास विरुद्ध आहे हे पुढे भट्टोजी दीक्षिताचे मत लिहिले आहे त्यावरूनही स्पष्ट होते: नच कलिनिषिद्धस्यापि युगान्तरयिधर्मस्यैव नहेगने इत्यादिपराशरवाक्यं प्रतिपादकमिति वाच्यं । कलावन यान धर्मानेव वक्ष्यामीति प्रतिज्ञाय तत्ग्रन्थप्रणयनात।* कलियगांत ज्याचा निषेध केला आहे अशा विवाहाचा विधि कलियुगा खेरीज दुसऱ्या युगांमध्ये सांगण्याकरितां पराशराचे वचन आहे असे लणतांच येत नाही. कारण, कलियुगांत जे धर्म आचरावयाचे तेच सांगण्याच्या उद्यशाने त्याने संहिता केली आहे." वर लिहिलेल्या युक्तीवरून व ग्रंथांतरांतल्या प्रमाणांवरून, माधवाचार्याची व्याख्या पराशरसंहितेच्या उद्देशाशी आणि पुनर्विवाह, ब्रह्मचर्य व सहगमन याविषयींच्या वचनांच्या त्याच्या स्वतांच्या व्याख्येशी संगतवार जुळत नाही हे स्पष्ट

  • चतुर्विशति स्मृति व्य व्या, विवाह प्रकरण.