पान:विधवाविवाह.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर्व विधवांस प्रथमच तो सांगितला. ब्रह्मचर्याने राहणे कठिण आहे, सबव ज्यांस तसे राहण्याविषयों आपल्या मनाची तितकी दृढता वाटत असेल त्यानी तसे राहावे व तसे रा. हण्याबद्दल त्यांस स्वर्ग सुखाची प्राप्ति होईल असा दुसरा पक्ष सांगितला. सहगमन हे फारच अवघड तेव्हां तें करण्यासारखे धारिष्ट ज्या स्त्रियांच्या अंगी असेल त्यांनीच तें करावे व ते करण्याबद्दल स्त्रियांस अनंतकाल पावेतों स्वर्गवामाची प्राप्ति होईल असा तिसरा पक्ष सांगितला. असे असतां सोपा धर्म जो पुनर्विवाह तो माधवाचार्याने मागील यांविषयी म्हणन सांगितले आणि फारच अवघड असे जे ब्रह्मचर्य व सहगमन हे ) दोन धर्म ते कलियुगाविषयों सांगितले. आतां, अवघड धर्म आचरण्याविषयों कलियगांत मनुष्यांची प्रवृत्ति होणार नाही म्हणन पराशराचा उद्देश कलियुगाकरितां अगदी सोपे धर्म सांगण्याचा आहे, अशी माधवाचार्याने पूर्वी जी व्याख्या केली आहे नीम त्याचीच ही पुनर्विवाह, ब्रह्मचर्य व सहगमन यावि. षयींची व्यवस्था जमते किंवा कसे याचा विचार वाचणायांनीच करावा. मागील युगांतली मनुष्ये अत्यंत दृढ निश्वयाची असून त्यांस जो अतिशय सोपा धर्म करण्याची मोकळीक होती तोच करण्याची मनाई कलियुगांतल्या अशक्त व चंचल निश्चयाच्या मनुष्यांस असावी ही कल्पना फारच चमत्कारिक आहे. वस्तुतः कलियुगांतले लोक पूर्वीच्या युगांतल्या आपल्या पूर्वजांपेक्षां शरीराने व मनाने फारच अशक्त झाले आहेत त्यामळे अवघड धर्म आच