पान:विधवाविवाह.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५० या वरून असे दिसते की, आपला प्रिय पुत्र व्यास याच्या विनंतीवरून पराशर कलियुगांतले धर्म त्यास सांगू लागला. आतां आमच्या वाचणाऱ्यांनी विचार करावा की, वर लिहिलेली पराशराची मूळवचने व त्यांजवरची खद्द माधवाचार्याची व्याख्या यांजवरून, कलियुगांत धर्माचा निर्णय सांगणे हाच एक पराशरसंहितेचा उद्देश आहे असे अगदी निःसंशय सिद्ध होते किंवा नाही. आणि या सं. हितेचा हाच उद्देश आहे असे समजलें म्हणजे तो साद्यंत ग्रंथ केवळ कलियुगाविषयींच आहे हे अवश्य कबूल केलेंच पाहिजे. तेव्हां विधवा व दुसऱ्या स्त्रिया यांच्या विवाहाविषयोंचे वचन दुसऱ्या युगांविषयी अशी कल्पना करणे अगदीच असंगत आहे. कलियुगाच्या प्रारंभी व्यास व दुसरे क्राषि यांनी आम्ही पूर्वीच्या युगांतल्या धर्माचे ज्ञान संपादिले आहे असे स्पष्ट सांगून आम्हांस कलियुगांतल्या धर्माचा उपदेश करा अशी पराशरास प्रार्थना केली. त्यावरून पराशर आपल्या सर्व ग्रंथांत त्याच यगाचे धर्म सांगत असतां मध्ये एकच वचन युगांतरच्या धर्मा विषयी सांगेल ही कल्पना करणे तिळमात्र तरी सयुक्तिक दिसते काय? यावरून पराशराने स्त्रियांच्या पुनर्विवाहाचा विधि केला तो केवळ कलियुगांतलाच धर्म आहे या विषयी अगदी संशयाचा लेशही नाही. पराशर संहितेचा उद्देश कलिधर्माचा निणय सांगावयाचा हाच आहे असा माधवाचार्याने आपल्या व्याख्येत