पान:विधवाविवाह.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सिद्धांत केला आहे हे वर दाखविलेच आहे. यास्तव त्या संहितेच्या उद्देशास उलटा व स्वतांच्या व्याख्यानासही वि. रुद्ध असा दसरा एखादा सिद्धांत त्या व्याख्याकाराने काढल्यास तो सयुक्तिक आहे असे कोणीही मानणार नाही. विवाह, ब्रह्मचर्य व सहगमन या विषयांच्या पराशर वचनांवरील पढे लिहिलेल्या अभिप्रायाची माधवाचार्याची व्याख्या, विवाहविषयकवचन कलियुगाखेरीज इतर युगांविषयों लागू असें मटल्यास, असंबद्ध होईल: "कांही एक आपत्तीत स्त्रियांत पुनर्विवाह करणे विहित ह्मणजे सशास्त्र आहे." " पनर्विवाह करण्यापेक्षां ब्रह्मचर्याने राहणे स्त्रियांस अधिक श्रेयस्कर आहे." ब्रह्मचर्याने राहण्यापेक्षाही सहगमन करणे हे अधिकश्रेयस्कर आहे." माधवाचार्यांच्या मती पुनर्विवाह पूर्वीच्या युगांविषयी मागितला आहे, आणि ब्रह्मचर्य व सहगमन ही कलियुगाविषयों सांगितली आहेत. तेव्हां पुनर्विवाहाचे विधायक आणि ब्रह्मचर्य व सहगमन यांचों विधायक या वचनांचा परस्परांशी संबंधच राहिला नाही. आता पुनर्विवाह विषयक वचन पूर्वीच्या युगांविषयींच आहे असा माधवाचार्याने सिद्धांत केला त्यावरून कलियुगांतील विधवांस पुनर्विवाहाचा अधिकारच नाही; तेव्हां आतां कलियुगांतील वि. धवांस उद्देशन पुनर्विवाह करण्यापेक्षां ब्रह्मचर्याने राहणे स्त्रियांस अधिक श्रियस्कर आहे, असे जे तुलने करून अधिक