पान:विधवाविवाह.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अतः कलौ प्राणिनां प्रयाससाध्ये धर्म प्रवृत्त्यसम्भवात् सुकरो धर्मोऽत्र बुभत्सितः। "विष्णुपुराणांत असे सांगितले आहे की, 'चारी वर्णाचे व चारी आश्रमांचे ( ब्रम्हचर्य, गार्हस्थ्य, वानप्रस्थ आणि सन्यास, या आश्रमांचे ) विशेष धर्म यांचे आचरण करण्याविषयी कलियुगांत मनुष्यांची प्रवृत्ति नाही. आदिपुराणांतही असे सांगितले आहे की, 'कृतयुगांतल्या धर्माचे आचरण कलियुगांत होत नाही. कारण ( कलीत ) स्त्रिया व पुरुष यांची प्रवत्ति पापाकडे फार आहे.' जे धर्म आचरण्यास कठिण ते आचरण्याविषयों कलियुगांत मनुष्यांची प्रवृत्ति होण्याचा असंभव आहे; यास्तव सुखाने आचरण्या सारखे धर्म कोणते ते जाणण्याची व्यासाची इच्छा होय." या सर्व गोष्टींवरून, मन्वादिकांनी सांगितलेले धर्म सत्य त्रेता आणि द्वापार या युगांसच लागू आहेत आणि त्या सर्वांचे आचरण कलियुगांत होणे असंभाव्य आहे हे अगदी उघड आहे. याच हेतूस्तव व्यास, पराशरास, कलियगांत ज्यांचे आचरण सहज करितां येईल असे धर्म सांग. ण्याविषयी, विनंती करितो. - पराशरसंहिता. व्यासवाक्यावसानेतु मुनिमुख्य: पराशरः । धर्मस्य निर्णयं प्राह सूक्ष्म स्थूलंच विस्तरात् ॥ "व्यासाचे भाषण संपल्यावर मुनीमध्ये श्रेष्ठ पराशर, हा धर्मातील साधारण तत्वे व बारीक गोष्टी यांचा निर्णय विस्ताराने सांगू लागला."