पान:विधवाविवाह.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुता, कलियुगांत मनुष्यांस हितावह असे धर्म ( कर्त्त व्यकर्मे ) व आचार (संप्रदाय) कोणते ते आम्हास सांग" माधवाचार्याची व्याख्या. वत्तमाने कलाविति विशेषणात् युगान्तरधर्मज्ञानानन्तर्यम् । "त्यानंतर' म्हणजे, सत्य, त्रेता आणि द्वापार या युगांच धर्म ऋषींस सांगितल्या नंतर त्यांनी कलियुगांतील धर्म सां. गण्याविषयी व्यासास विनंती केली. अतः शब्दोहेत्वर्थः यस्मादेकदेशाध्यायनो नाशेषधर्मज्ञानं यस्माच्च युगान्तरधर्ममवगत्य न कलिधर्मावगतिस्तस्मादिति । " " 'यास्तव' म्हणजे एका भागाचे अध्ययन करणाऱ्यास संपूर्ण धर्माचे ज्ञान होत नाही आणि दुसऱ्या युगांतल्या ध. मांचे ज्ञान झाले तरी त्यापासून कलियुगांतल्या धर्माचें ज्ञान होत नाही, यास्तव' ऋषींनी विनंती केली. यावरून असे स्पष्ट दिसते की, कलियुगाच्या आरंभी ऋषींस सत्य, त्रेता व द्वापार या युगांचे धर्म माहीत होते आणि कलियुगाचे धर्म आपणास समजावे अशी त्यांस इ. च्छा झाली आणि ते सांगण्या करितां व्यासाकडे जाऊन त्यांनी विनंती केली. पराशरसंहिता. तच्छुत्वा ऋषिवाक्यन्तु सशिष्योऽग्न्यर्कसन्निभः प्रत्युवाच महातेजाः श्रुतिस्मृतिविशारदः ॥