पान:विधवाविवाह.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय २. पराशराचे पुनर्विवाहविषयक वचन कलियु गासच लागू आहे दुसऱ्या युगास नाहीं. स्त्रियांच्या पुनर्विवाहवियषक पराशराच्या वचनाची व्याख्या करून नंतर माधवाचार्य असा सिद्धांत करितो की; अयंच पुनरुद्वाहो युगान्तरविषयः । तथाचादि पुराणम् ऊढायाः पुनरुद्वाहं ज्येष्ठांशं गोवधं तथा । कली पंच न कुर्वीत भ्रातृजायां कमंडलुम ॥ माधवाचार्याचे हे म्हणणे रास्त व सयुक्तिक आहे किंवा कसे याचा विचार केला पाहिजे यास्तव अगोदर पराशराचा उद्देश कोणता आहे याचा त्याच्या संहितेच्या आशयावरून व तिजवरील स्वतः माधवाचार्याच्या व्याख्यवरून निर्णय केला पाहिजे. पराशरसंहिता. अथातो हिमशैलाये देवदारुवनालये । व्यासमेकाग्रमासीनमपृच्छन्नषयः पुरा ॥ मानुषाणां हितं धर्म वर्तमाने कलौ युगे। शौचाचारं यथावच्च वद सत्यवतीसुत ॥ " 'यास्तव' पुरातन काळी व्यास हिमालयाच्या अग्रावर देवदार वक्षांच्या वनामध्ये एकाग्र चित करून बसला असतां त्यास ऋषींनी 'त्यानंतर' विनंती केली की, हे सत्यवती +अर्थ 30 व्या पृष्ठावर ही पंक्ति आहे तेथे पाहावा. * अर्थ ३५ व्या पृष्ठांत हे वचन आहे तेथे पाहावा.