पान:विधवाविवाह.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ आहे. म्हणजे त्या विशेष विधीवरून पशुहिंसेचा सामान्य निषेध, वेदविहित अश्वमेधादि यागांत सांगितलेली पशुहिंसा सोडून, बाकी राहिलेल्या सर्व स्थळी लाग करावा. याच विषयावर मनचे मत पुढे लिहिल्या प्रमाणे आहे: मधुपर्के च यज्ञेच पितृदेवतकर्मणि । अत्रैव पशवो हिंस्या नान्यत्रेत्यब्रवीन्मनुः ॥ "मधुपर्क, यज्ञ, व श्राद्ध या कर्मांमध्ये मात्र पशूचा वध करावा, अन्यत्र करूं नये असें मनूचे वचन आहे." यावरून असा विचार करावा की, वर सांगितलेल्या गोष्टीत सामान्य नियम एक प्रकारचे असून विशेष नियम तद्विरुद्ध असले तरी आपण विशेष नियमांप्रमाणे चालतो. आणि विशेष नियमांत ज्यांचा संग्रह नाही अशा स्थळी सामान्य नियम लागू करितो. यास्तव कलियुगांत स्त्रियांच्या पुनर्विवाहाचा सामान्य निषेध आहे तरी पांच प्रकारच्या आपत्तीमध्यें पराशराने पुनर्विवाहाचा विशेष विधि केला आहे त्याचे अनुसरण केले पाहिजे. आदिपुराण वगैरे ग्रंथांतील सामान्य निषेधास पांच आपत्ति सोडून बाकीच्या ठिकाणी चारितार्थ आहेच. पुनर्विवाहप्रकरणी परस्पर विरुद्ध दिसणाऱ्या वचनांची एक वाक्यता करण्याविषयी सरळ व सयुक्तिक असा हाच मार्ग आहे असे मला दिसते.