पान:विधवाविवाह.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४१ आतां पाहा, (प्रत्यही ) प्रातःकाळी आणि सायंकाळी संध्या करावी असा सामान्य विधि व न केली असतां प्रत्य'वाय हे मनुस्मतीत सांगितले आहेत, तरी व्यासोक्त विशेष निषेधा वरून कितीएक दिवशी सामान्य विधीचा बाध का रून संध्या करीत नाहीत. आणि सामान्य विधीप्रमाणे, व्यासाने सांगितलेल्या विशेष दिवसां खेरीज इतर दिवशी संध्या कारितात. पुनः वेदांत एके ठिकाणी, मा हिंस्यात् सर्वाभूतानि । प्राणी मारूंनयेत,” अशी एक सामान्य आज्ञा आहे. पात दसऱ्या ठिकाणी पुढे लिहिल्या प्रमाणे आज्ञा आहेत. अश्वमेधेन यजेत । "घोडा मारून त्याच्या मांसाने यज्ञ करावा." पशुना रुद्रं यजेत । "पशु मारून त्याच्या मांसाने रुद्रयाग करावा." अग्नीषोमीयं पशुमालभेत । अग्नि व सोम यांच्या उद्देशाने यज्ञ करावयाचा तो पशु मारून त्याच्या मांसाने करावा." वायव्यं श्वेतमालभेत । "वायच्या उदेशाने यज्ञ करावयाचा तो पांढरा बोकड मारून त्याच्या मांसाने करावा." आतां पाहा, वेदामध्ये एका ठिकाणी प्राणी मारूं नयेत असा सामान्यतः स्पष्ट निषेध असतां, वेदामध्येच दुसऱ्या ठिका णी अमुक यज्ञांत अमुक पशु मारावे असे विशेष विधि असल्यावरून ते मारणे हे कृत्य पुण्यप्रद आहे असे मानलेले