पान:विधवाविवाह.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१० " संध्या, पंच महायज्ञ, आणि स्मृतीन सांगितलेली नित्य कर्मे ही अशौच म्हणजे सुतक व सुयेर यांमध्ये करूं नये. अशौच संपल्या नंतर ती पुनः करावी." . येथे अशौचकालामध्ये जाबालि संध्या करण्याचा निषेध करतो. आतां पाहा, संध्या प्रत्यही करण्याविषयों वेदांत सामान्य विधि आहे तरी जाबालीच्या विशेष निषेधास्तव ती अशौचाच्या दिवसांत करीत नाहीत. पुनः, मनुस्मृति. पूवी सन्ध्यां जपंस्तिष्ठेत् सावित्रीमार्कदर्शनात् । पश्चिमान्तु समासीनः सम्यगक्षविभावनात् ॥ न तिष्टति तु यः पूर्वी नोपास्ते यश्च पश्चिमाम् । स शूद्रवहहिष्कार्यः सर्वस्माद्विजकर्मणः ॥ "प्रातःसंध्येत सूर्य दृष्टीसपडे पर्यंत द्विजाने उभ्याने गायत्रीचा जप करीत असावे, आणि सायंसंध्येत स्वच्छ नक्षत्र दर्शन होई पर्यंत बसून तिचा जप करीत असावे. आणि जो प्रात:संध्येत जप करीत उभा राहात नाही व सायंसं. ध्येत जप करीत बसत नाही त्यास, द्विजांस विहित जे कम त्या पासून शूद्राप्रमाणे बहिष्कृत करावे.” परंतु, संक्रान्त्यां पक्षयोरन्ते द्वादश्यां श्राद्धवासरे । साय सन्ध्यां न कुर्वीत कृते च पितहा भवेत् ॥ “संक्रांत, पोर्णिमा, अमावास्या, द्वादशी आणि श्राद्धतिथि इतक्या दिवशी संध्याकाळी संध्या करूनये; केली असतां पितहत्या केल्याचे पातक लागते." * हे व्यासवचन तिथितत्वात उतरून घेतले आहे.