पान:विधवाविवाह.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तर आतां पाहा, कात्यायनादि कांहों ऋषींनी विशेष यु. गाचा उल्लेख न करितां किती एक प्रसंगी विवाहित स्त्रीच्या पुनर्विवाहाचा विधि केला आहे. हाच विधि सर्व युगांस सारखा उपयोगी पडता; परंतु आदिपुराणादि ग्रंथांत कलियुगांत त्या विवाहाचा निषेध केला आहे तेव्हां त्या युगा विषया विशेष निषेध झाला, ह्मणून कात्यायनादि ऋषींचा विधि कलियुगा खेरीज इतर तीन युगांस लागू होतो. पनः आदिपराणादि ग्रंथांत काही प्रसंगांचा विशेष उल्लेख न करितां सामान्यतः कलियुगांत स्त्रियांच्या पुनर्वि वादाचा निषेध केला आहे; परंतु पराशराने काही विशेष प्रसंग सांगितले आहेत आणि त्या प्रसंगी कलियुगांत पुनविवाह करणे सशास्त्र आहे असे सांगितले आहे. यावरून पराशराचा विधि तितक्याप्रसंगांस विशेष आहे; आणि आदिपराणादि ग्रंथांतील निषेध पराशराने सांगितल्या शिवाय जे प्रसंग राहिले त्या सर्वांस लागू आहेत. सामान्य आणि विशेष विधि अथवा निषेध एकाच स्थली प्राप्त झाले असता त्यांची व्यवस्था करण्याची नेहमीची रीति हीच आहे. पाहा: म अहरहः सन्ध्यामुपासीत ।। "प्रत्यहीं संध्या करावी." संध्या करण्याविषयों वेदांत हा साधारण नियम लिहिला आहे. परंतु, संध्यां पंच महायज्ञान् नैत्यकं स्मृतिकर्म च । तन्मध्ये हापयेत्तेषां दशाहान्ते पुनः क्रिया ॥* * हे जाबालिवचन शुद्धित्तत्वात आहे.