पान:विधवाविवाह.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८ युगाचा विशेष उल्लेख न करतां पति अविचारी, पतित, नपुंसक, रोगी, अपस्मारी, नीचकुळांतला, नीचस्वभावाचा, दास, एकगोत्री, भिन्न जातीचा, असा निघाला, अथवा सन्यस्त झाला, नाहीसा झाला किंवा मेला, तर त्याशी विवाहित स्त्रीचा पुर्नविवाह करावा असा सामान्य विधि केला आहे. आदिपुराण. ऊढायाः पुनरुद्वाहं ज्येष्ठांशं गोवधं तथा । कलौ पंच न कुर्वीत धातृजायां कमंडलुम् * ॥ क्रतुसंहिता. देवराञ्च सुतोत्पतिदत्ता कन्या न दीयते । न यज्ञे गोवधः कार्यः कलौ नच कमंडलः ॥ वृहलारदीयपुराण. दत्तायाश्चैव कन्यायाः पुनीनं परस्य च । आदित्यपुराण. दत्ता कन्या प्रदीयते ॥ परंतु पराशरसंहिता. नष्टे मते प्रवाजिते क्लीबे च पतिते पतौ। पंचस्वापत्सु नारीणां पतिरन्यो विधीयते ॥ याप्रमाणे आदिपुराण वगैरे ग्रंथ विवाहित स्त्रीच्या पुनविवाहाचा कलियुगांत सामान्यतः निषेध करतात. आणि पराशर विशेष प्रकारच्या पांच आपत्ति सांगन त्यांतली ए. खादी आली असतां कलि युगांत त्याच विवाहाचे विशेष विधान करतो.

  • या सवांचे अर्थ 3५, व्या पृष्ठावर लिहिलेले आहेत ते पाहावे. +याचा अर्थ ९ व्या पृष्ठावर लिहिला आहे तो पाहावा.