पान:विधवाविवाह.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सतु यद्यन्यजातीयः पतितः क्लोब एव च । विकर्मस्थः सगोत्रो वा दासो दीर्घामयोऽपिवा ।। ऊढापि देया सान्यस्मै सहाभरणभषणा* ॥ " विवाह झाल्या नंतर, पति दुसऱ्या जातीचा, पतित, नपुंसक, बरे वाईट न पाहतां पाहिजे ते करणारा, एकाच गोत्राचा, दास ह्मणजे गुलाम, अथवा सदारोगी असा आहे असे आढळल्यास (त्याजबराबर) लग्न लावलेली स्त्री वस्त्र व अलंकार यांनी युक्त अशी दुसऱ्या नवऱ्यास द्यावी." वसिष्ठ ह्मणतोकलशीलविहीनस्य पंढादिपतितस्य च । अपस्मारिविधर्मस्य गणां वेषधारिणाम ॥ दत्तामपि हरेत् कन्यां सगोत्रोढां तथैव च ॥ " ज्याचें कुल व आचरण नीच आहे, जो नपुंसक पतित, फेंपरें येणारा, बरे वाईट न पाहतां पाहिजे ते करणारा, रोगी, वेषधारी झणजे नट, अथवा एकाच गोत्राचा असा आहे त्या वरास दिलेली कन्या परत घ्यावी." ह्मणजे घेऊन अर्थात दुसऱ्या वरास द्यावी. नारद म्हणतोनष्टे मते प्रबजिते कीबे च पतिते पतौ। पंचस्वापत्सु नारीणां पतिरन्यो विधीयते* ॥ याप्रमाणे कात्यायन, वसिष्ठ आणि नारद यांनी कोणत्याच *पराशरभाष्य व निर्णयसिंधु या ग्रंथात हा उतारा आहे. +हे वचन उद्वाहतत्वात घेतलेले आहे. * याचा अर्थ २ व्या पृष्ठां न लिहिला भाहे तो पाहावा.