पान:विधवाविवाह.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शब्दांनी निषेध केला आहे. परंतु पराशरसंहितेत पुढे लिहिल्या प्रमाणे आढळते. नष्टे मते प्रव्रजिते क्लीबे च पतिते पतौ । पंचस्वापत्सु नारीणां पतिरन्यो विधीयते ॥* म्हणजे या पांच आपत्ती पैकी कोणती एखादी स्त्रीस आली असतां ति का पुनर्विवाह करण्यास मोकळीक आहे. याप्रमाणे कलियुगांत स्त्रियांच्या पुनर्विवाहाची विधायक व निषेधक अशी दोन्ही प्रकारची वचने आम्हां पुढे आहेत. या परस्परविरुद्ध दिसणाऱ्या वचनांची एकवाक्यता करणे झाल्यास ती पुढे लिहिल्या प्रमाणे करावी. वरलिहिलेल्या आदिपुराण वगैरे ग्रंथांतील वचनांत कालेयुगांत विवाहित स्त्रीच्या विवाहाचा निषेध सामन्य आहे. पराशरसंहितेत निरनिराळ्या प्रकारच्या पांच आपत्तींतून कोणती ही आली असतां पुनर्विवाह करावा असा विधि विशेष आहे. जेथे एकाच गोष्टीविषयी सामान्य व विशेष नियम लाग होत असतात तेथे अशी रीति आहे की, विशेष नियम मांगितलेल्या विशेष गोष्टीसच लागू करावे आणि बाकी राहिलेल्या सर्व गोष्टींस सामान्य नियम लागू करावे. या वरून असे सिद्ध होते की, पराशराचा विशेष विधि पांच प्रकारच्या आपत्तींच्या स्थली लागू करावा आणि आदिपुराण वगैरेंतील निषेध सर्व सामान्य गोष्टींस लागू करावे. याव्यवस्थेनें परस्परांशी विरुद्ध दिसणाऱ्या वचनांची एकवाक्यता होऊन विधि व निषेध या दोहोंसही स्थले मिळतात. याच विषयाचाआतां विशेष विचारकरूं.कात्यायन म्हणतोः* याचा अर्थ ९ व्या पृष्ठांत लिहिला आहे तो पाहावा.