पान:विधवाविवाह.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३५ आदिपुराण ऊढायाः पुनरुद्वाहं ज्येष्टांशं गोवधं तथा । कलौ पंच न कुर्वीत म्रात जायां कमंडलम् ॥* "विवाहित स्त्रीचा पुनर्विवाह करणे; उत्तम भाग ज्येष्ठ बंधूस देणे ; गोवध करणे ; भावजईच्या ठायों पुत्रोत्पत्ति कर णे; सन्यास घेणे; ही पांच कृत्ये कलियुगांत करूं नयेत." क्रतुसंहिता देवराच सतोत्पत्तिर्दत्ता कन्या नदीयते । न यज्ञे गोवधः कार्यः कलौ नच कमंडलुः ॥ "कलियुगांत भावजईने धाकटया दिरापासून पुत्रोत्पत्ति करून घेऊ नये; एक वेळ दिलेली कन्या पुनः देऊ नये; यज्ञकर्मात गाय मारूं नये; आणि सन्यास घेऊ नये." वृहन्नारदीयपुराण, दत्तायाश्चैव कन्यायाः पुनानं परस्य च । "कलियुगांत दिलेल्या कन्येचे दुसऱ्या वरास पुनः दान करूं नये." आदित्यपुराण. दत्ता कन्या प्रदीयते । "कलियुगांत, एकदा दिलेल्या कन्येचें दान निषिद्ध आहे." याप्रमाणे आदि पुराण, ऋतुसंहिता, बृहन्नारदीय पुराण, व आदित्यपुराण यांत स्त्रियांच्या पुनर्विवाहाचा सामान्य

  • पराशरसंहितेच्या व्याख्येत माधवाचायाँ ने लिहिले आहे.