पान:विधवाविवाह.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३३ आनं परिगता या च पुनर्भूप्रभवा च या । इत्येताः काश्यपेनोक्ता दहति कुलमानवत् ॥ . " सात प्रकारच्या पुनर्भं कन्या कुलांत अधम आहेत, त्यांज बरोबर लग्न करू नये. वाचादत्ता, हणजे शब्दाने शपथ पूर्वक एखाद्यास दिलेली; मनोदत्ता, ह्मणजे आ ईबापानी अथवा रक्षकाने आपल्या मनानेच दिलेली; कृतकौतुकमंगला, ह्मणजे जिच्या हातांत विवाह संबंधी कंकण बंधन झाले आहे ता; उदकस्पर्शिता, ह्मणजे सुवर्णाभिषेक झालेली; पाणिग्रहीतिका, मणजे जिचे पाणिग्रहण झाले आहे ती; अग्निपरिगता, ह्मणजे जिचा विवाहहोम झाला आहे ती; आणि पुनर्भू प्रभवा लणजे पुनर्भू स्त्रीपासून उत्पन्न झालेली; काश्यपाने सांगितलेल्या या सात कन्या वरल्या असतां वरणाराचे कुळ अग्नीप्रमाणे जाळतात. आतां पाहा, ज्यांशी विवाह करूंनये अशा कन्यांतच वाचादत्त कन्येचे ग्रहण करून काश्यपाने तीस पुनर्भ म्हणजे दुसऱ्या विवाहाची हे नांव दिले आहे; यावरून वि. च्याही विवाहाचा निषेध आहेच. विवाहित स्त्री व वाचा दत्त स्त्री या उभयतांचा निषेध काश्यपाने सारखाच केला आहे. यास्तव, विवाहित स्त्रीच्या विवाहाची निषेध. कारक वचने आहेत म्हणून तिच्या विवाहाच्या विधायक पराशरवचनाचा मी लिहिलेला अर्थ करूनये असे जर म्हटले तर, त्याच न्यायाने वाचादत्त कन्येच्या विवाचा निषेध काश्यपाने केला आहे यास्तव तिच्याही विवाहा विषयों पराशराचे वचन लावतां येत नाही. यावरून पराशर