पान:विधवाविवाह.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

क्षत्रिया षट् समास्तिष्टेदप्रसूता समात्रयम् । वैश्याप्रसता चत्वारि द्वे वर्षेत्वितरा वसेत् । न शूद्रायाः स्मृतः काल एष प्रोषितयोषिताम् । जीवति श्रूयमाणे तु स्यादेष द्विगुणो विधिः । अप्रवृत्तौ तु भूतानां दृष्टिरेषा प्रजापतेः ॥ अतोऽन्यगमने स्त्रीणामेष दोषो न विद्यते ॥ * " पतीचा शोध लागेनासा झाला, तो मेला, सन्यस्त झाला, नपुंसक ठरला, किंवा पातित मणजे दुराचारी निघाला तर बायकोने दुसरा पति करावा असा विधि आहे. प्रवासास गेलेल्या पतीची मार्गप्रतीक्षा ब्राह्मणस्त्रियेने आठवर्षे पावेतों करावी, आणि मूल झाले नसले तर चार वर्षे करावी आणि मग तिने दुसरा पति करावा. क्षात्र यस्त्रियेने सहा वर्षे वाट पाहावी आणि मूल झाले नसेल तर तीनच वर्षे वाट पाहावी. वैश्यस्त्रियेने मूल झाले असेल तर चार वर्षे वाट पाहावी आणि नसेल तर दोनच वर्षे पाहावी. शूद्रस्त्रियेने प्रवासास गेलेल्या पतीची वाट अमुक वर्षे पर्यंत पाहावी अशी कालमर्यादा मुळीच नाही. पति जिवंत आहे इतकीच वार्ता कळल्यास पूर्वोक्त कालमर्यादा दुप्पट धरावी असा नियम आहे. जिवंत असल्याची बातमी नसल्यास पूर्वी सांगितलेल्या मर्यादा समजाव्या. या प्रमाणे ब्रह्मदेवाचे मत आहे. यास्तव त्या त्या कालमर्यादे नंतर स्त्रियांनी दुसरा पति केल्यास दोष नाही. आतां यावरून दिसते की, वरील विवाहविषयक वचन * नारद संहिता अध्याय १२ वा.