पान:विधवाविवाह.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अथवा त्यास पांच आपत्ती पैकी दुसरी एखादी आपत्ति आली तर त्या कन्येने यावज्जीव ब्रह्मचर्य व्रताने राहावे अथवा तो मेला असता त्याच्या प्रेताशी सहगमन करावे असें ह्मणणे हे न्याय्य नव्हे व सयुक्तिक ही नव्हे. आणखी असाही एक विचार आहे की, जर वरील वचन वाचादत्त कन्येविषयी कशाही रीतीने लावता येते तर, हे विवाहविधायक वचन कलियुगा खेरीज इतर युगांविषयी आहे असा जो माधवाचार्याचा कटाक्षपूर्वक पुढचा लेख आहे तो त्याने लिहिला नसता. 4 अयंच पुनरुद्वाहो युगांतरविषयः । "ही पराशराची पुनर्विवाहाची आज्ञा कलियुगा खेरीज इतर युगांविषयी समजली पाहिजे." ___ माधवाचार्याच्या व्याख्येवरून आणि ही पुनर्विवाहा आज्ञा इतर युगांविषयों आहे, या त्याच्या ह्मणण्या वरून राशराचे विवाह विधायक वचन वाचादत्त कन्येविषयों का नाहीं यांत अगदी संशय उरला नाही. नारदसंहिता पाहिली असतां, "पतीचा पत्ता नाहीसा झाला असतां" इत्यादि अर्थाच्या वचनांत सांगितलेले पन विवाहाचे विधान वाचादत्त कन्येविषयी सुतरां मणतांच येते नाहीं असे अगदी स्पष्ट होईल. ते असे :--- नष्ट मते प्रव्रजिते क्लीबे च पतिते पतो।। पंचस्वापत्सु नारीणां पतिरन्यो विधीयते ॥ अष्टौ वर्षाण्यपेक्षेत ब्राह्मणी प्रोषितं पतिम् । अप्रसूता तु चत्वारि परतोऽन्यसमाश्रेयत् ।