पान:विधवाविवाह.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नष्ट मते प्रबजिते क्लीबे च पतिते पतौ । पंचस्वापत्सु नारीणां पतिरन्यो विधीयते ॥ पुनरूद्वाहमकृत्वा ब्रम्हचर्यन्त्र तानुष्टाने श्रेयोतिशयं दर्शयति ॥ "पनर्विवाह न करितां ब्रह्मचर्यव्रताने राहिल्यास पुण्य विशेष आहे असे दर्शवितो. ते असे: मते भर्तरि या नारी ब्रह्म वयं व्यवस्थित्ता । सा मृता लभते स्वर्ग यथा ते ब्रह्मचारिणः ॥ ब्रह्मचर्यादप्यधिकं फलं अनुगमने दर्शयति ॥ "ब्रह्मचर्यव्रताने राहण्यांत जे पुण्य आहे त्याही पां सहगमनांत पुण्य विशेष आहे असे दर्शवितो.” ते असे. तिनः कोटयोर्द्ध कोटी च यानि लोपानि मानवे । तावत् कालं वसेत् स्वर्ग भर्तारं यानुगच्छति ॥* पराशर असे प्रतिपादन करितो की, प्रथमतः पुनर्विवाह हा सशास्त्र आहे; दुसरें, ब्रह्मचर्याने राहणे हे पुनर्विवाहावे. क्षां विशेष श्रेयस्कर आहे; आणि तिसरे, सहगमन हे तीन्ही गोष्टी मध्ये श्रेष्ठ आहे. यावरून असे दिसते की या तीन्ही गोष्टी एकाच स्त्रीस लागू आहेत. तेव्हां विवाहविधि जर वाचा दत्तकन्येविषयी असेल तर ब्रह्मचर्य व सहगमन हे विधि तिजविषयींच असले पाहिजेत. परंतु कलियुगांत हणजे प्रस्तुतकाळी ज्या वरास जी कन्या केवळ वाचा दत्त झाली तो वर तिशी विवाह होण्यापूर्वीच मेला * यांचे अर्थ ९ व्या पृष्टांत ही आली आहेत तेथे लिहिले आहेत.