पान:विधवाविवाह.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय २ ला. पराशराचे वचन प्रत्यक्ष विवाहित स्त्रियांसच लागू आहे केवल वाचादत्त कन्यांस नव्हे. "पतीचा पत्ता लागेनासा झाला" इत्यादि संकट आली असतां दुसरा पति करण्या विषयींचें जें पराशराचे वचन आहे ते प्रत्यक्ष विवाहित स्त्रियांविषयों नव्हे, तर ते वाचा दत्त कन्यांविषयी आहे, असा कोणी प्रतिपक्षी यांनी निर्णय केला आहे. तेव्हां तो निर्णय रास्त आहे किंवा नाही हे पाहणे आवश्यक आहे. प्रथमतः पराशरसंहितेच्या टीकेत विवाह, ब्रह्मानी सहगमन यांची विधायक पराशराची वचने लिहिताना स जें अवतरण माधवाचार्याने दिले आहे त्यावरून विधायक वचन वाचादत कन्यांविषयी नव्हे हैं - ते असें: परिवेदनपय्यांधानयोरिव स्त्रीणां पुनरुद्वाहस्यारि प्रसंगात् कचिदभ्यनुज्ञां दर्शयति. "परिवेदन व पर्याधान यांविषयी सांगून त्यांज प्रमाणेच स्त्रियांस पुनर्विवाहाचा ही प्रसंग आहे, तेव्हां कांहीं पर पनर्विवाह शास्त्रसंमत आहे असे दाखवितो. ते असे: + ज्येष्ट बंधूचा विवाह होण्या पूर्वी जो कनिष्ठ बंधूचा विवाह त्यास परि देदन म्हणतात.

  • ज्येष्ठ बंधनें अग्निहोत्र घेण्यापूर्वी कनिष्ठ बंधूने आग्नहोत्र घेणे यास पयी बान म्हणतात.

त्यावरून विवाहा यी नव्हे हे स्पष्ट आहे