पान:विधवाविवाह.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केला म्हणजे विधवाविवाहाची चाल शास्त्रसंमत आहे किंवा कसे या बदलचे सर्व संशय दूर होतील. माझ्या विरुद्ध पक्षाच्या लिहिणारांनी आपल्या ग्रंथांत, प्रकृत विषयास लागू नाहीत अशा गोष्टी बहुत लिहिल्या आहेत. त्या सोडून देऊन मला ज्या लागू दिसल्या त्यांची उत्तरें मी दिली आहेत. ही उत्तरे देण्याविषयों मी. आपणा कडून पुष्कळ परिश्रम केले आहेत; या करितां वाचणारांस माझी अशी प्रार्थना आहे की, त्यांनी हा ग्रंथ निदान एकवार तरी साद्यंत वाचन पाहावा, म्हणजे माझ्या श्रमांचे सार्थक झाले असे मी मानीन.