पान:विधवाविवाह.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

| साधन. कितीएक उत्तर देणारांस हीच गोष्ट हितावह झाला. त्यांनी आपापल्या ग्रंथांत घातलेल्या वचनांचे अर्थ ओढून ताणून भलतेच केले, आणि संस्कृत ज्यांस येत नाही अशा वाचणाऱ्यांस तेच त्यांचे अर्थ वास्तविकसे वाटले. तरी हा दोष वाचणाऱ्यांचा नाही. कारण, धर्मसंबंधी वादविवादांत पडलेले लोक धौर्त्य व लबाडी करून ऋषिवाक्यांचा भलताच अर्थ करतील व तो बिनदिकत छापून लोकांत प्रसिद्ध करतील असें सहसा कोणास वाटत नाही. कितीएक उत्तर देणारांस उगीच उपहास व शिवीगाळ करण्यांतच संतोष होतो हीगोष्ट फारच वाईट आहे. धमसंबंधी गोष्ठींच्या वादविवादामध्ये उपहास व शिवीगाळ ही मोठीच हत्यारे आहेत, असे मला ठाऊक नव्हते. या उत्तर देणारांनी उपहास वगैरे नकरतां त्याविषयाची योग्यता पाहून त्याच्या साधकबाधकांचा विचार करावयाचा होता. या प्रकारची उत्तरे देणारांच्या निरनिराळ्या ग्रंथांचा खप त्यांत ज्या ज्या मानाने उपहास व शिव्यागाब्दी आहेत त्या त्याच मानाने झाला आहे, ही गोष्ट मोटी आश्चर्य करण्यासारखी आहे. पुष्कळ उत्तरदेणारांनी हा प्रकार केलेला पाहून मला फार वाईट वाटले. परंत मग मी एक ग्रंथ वाचला आणि तेव्हापासून मला वाईट वाटले होते ते सर्व गेले. हा ग्रंथ ह्मणजे वर (नवरा) या सहीने माझ्या ग्रथास उत्तर होते. हा उत्तर देणारा वयोवृद्ध व या देशांत मोठा नामांकित शाह णा असून त्याने आपल्या ग्रंथांत कितीएक ठिकाणी फारच हलकटपणा