पान:विधवाविवाह.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंदु विधवाविवाह. प्रत्युत्तर. विधवांचा विवाह करण्याची चाल प्रवृत्तीत आणण्याचा विचार हिंदुलोकांस प्रथमच विदित केला तेव्हां मला अशी मोठी भीति वाटत होती की लोक त्याची अगदी हेलना करतील; आणि मी त्या विषयावर छापून प्रसिद्ध केलेल्या ग्रंथाचा हेतु व त्याचे नांव हीच तो लक्ष्यलावून न वाचण्याविषयींकारणीभूत होतील आणि तेणेकरून माझे श्रम अगदी निष्फळ होतील. पण हे माझे अनुमान अगदी उलट होऊन हिंदु लोकांची हा ग्रंथ घेण्याविषयी इतकी उत्सुकता दिसली की, हा प्रसिद्ध झाल्यानंतर एका आठवड्याच्या आंत त्याची दोन हजारांची पहिली आवृत्ति अगदी खपन गेली. तेव्हां मोठ्या उमेदीने दुसरी आवृत्ति तीन मीरांची काढली; ती ही थोड्याच काळांत बहुतेक खपून गेली. लोकांची एवढी उत्सुकता पाहून माझ्या मेहनतीचे चांगले सार्थक झाले असे मी मानितो. सर्व शास्त्री व इतरलोक ज्या विषयाची थट्टा व तिरस्कार करतील अशी भीति होती त्यावर मी लिहिलेल्या ग्रंथांत ल्या गोष्टींची उत्तरे त्यांनी मेहेरबानी करून दिली आणि त्यांबद्दल मेहनत घेतली व द्रव्यही खरचले यामुळे मला फार संतोष झाला. उत्तरे देणाऱ्यांमध्ये पुष्कळ लोक या देशांतील मोठे नामांकित प्रतिष्ठित, श्रीमान व विद्वान असे आहेत ही गोष्ट त्याहून आधिक संतोषास कारण झाली.