पान:विधवाविवाह.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शिष्ट पूर्वज परंपरया करीत आले आहेत त्या गोष्टी शास्त्र विहित धर्माप्रमाणेच प्रमाणभूत समजाव्या. आतां कलियुगांत विधवाविवाहाचा विधि पराशरसंहितेत स्पष्ट केला आहे, तेव्हां तो रुढिविरुद्ध आहे एवढ्यावरून तो अवैध आहे हे ह्मणणे सयुक्तिक नव्हे व शास्त्रसंमत ही नव्हे. कारण जेथें शास्त्राधार नाही तेथेच रुढि प्रमाण, असें वसिष्ठाने सांगितले आहे. यावरून कलियुगांत विधवाविवाह करण्याविषयी कोणतीच हरकत राहिली नाही हे अगदी उघडपणे सिद्ध झाले. बाळपणी वैधव्य प्राप्त झाल्यापासून होणारी जी असह्य दःखें त्यांची कल्पना, ज्यांच्या मुलींचे, बहिणींचे, सुनांचे, अथवा दुसऱ्याजवळच्या संबंधी स्त्रियांचे नवरे बाळपणी वारले आहेत, त्यांच्या मात्र मनांत बरोबर येईल. ब्रह्मच. र्याच्या धर्मांचे आचरण हातून न झाल्यामुळे शेकडो विधवा जारिणी झाल्या आहेत व त्यांनी गर्भनाश करून आपल्या पित्याच्या, मातेच्या व पतीच्या कुलांस कलंक लाविले आहेत. (विधवाविवाह चालू केला असतां वैधव्या पामन आमरणांत होणाया असह्य यातनांचे निवारण होईल; जारकर्माचे व गर्भनाशाचे गुन्हे कमी होतील; आणि त्यांपासन अनेक कुलांची अप्रतिष्ठा होऊन त्यांस कलंक लागतो तो लागणार नाही. आणि जेथपर्यंत या हितावह चालीचा लोक अंगीकार करणार नाहीत तोपर्यंत कसविणीचा व्यापार, व्यभिचार, अगम्यगमन व भ्रूणहत्या (गर्भनाश) या गोष्टींचे गुन्हे उत्तरोत्तर नेहेमी वाढत जातील,